आपल्या आयुष्यात सिंहाचा वाट असणाऱ्या ह्या सर्व महिलांनासाठी भा. ज. पा. ने काल ८ मार्च जागतिक महिलादिना निमित्त कुर्ला येथे समस्त महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.. ह्या सांकृतिक कार्यक्रमाला सर्व महिला बहु संखेने उपस्थित होत्या… ह्या कार्यक्रमाला महिलांसाठी विविध खेळ, गाण्याचे कार्यक्रम, बक्षीस समारंभ व इतर मनोरंजनाचे खेळ आयोजित केले होते… ह्या कार्यक्रमाला सौ मयुरी अमित शेलार यांनी महिलांना अजून प्रबळ होण्याचे प्रोत्साहन दिले तसेच सौ. कृतिका शैलेंद्र सावंत, सौ. अश्लेषा आनंद धुरी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.. तसेच श्री अमित शेलार, शैलेंद्र सावंत, श्री विशाल करंडे, श्री राजू तळेकर हि उपस्थित होते. जागतिक महिला दिनाच्या प्रित्यर्थ श्री अमित शेलार आणि श्री शैलेंद्र सावंत यांनी समस्त महिलांना भा. ज. पा. च्या विविध उपक्रमांबद्दल मार्ग दर्शन केले व त्यांनी महिला बचत गट व इतर उपक्रमांची माहिती दिली व त्यांना योग्य मार्ग दर्शन केले व त्यांना विविध घरगुती उद्योग हाती घेण्यासाठी प्रोत्साहन दिले…