आपल्या बरोबर सावली सारखी वावरणारी व्यक्ती म्हणजे आपल्या घरातली स्त्री. नेहमी स्वतः च्या इच्छा अपेक्षा बाजूला ठेऊन आपल्या इच्छा पूर्ण करणारी व्यक्ती म्हणजे स्त्री… काल ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या प्रित्यर्थ भा. ज. पा. ने ‘फन सिनेमा’ के स्टार माॅल, चेंबूर येथे “नीरजा” चित्रपटाचे शो समस्त महिलांना मोफत तिकीट वाटप करून दाखवण्यात आला. ‘ एक दिवस फक्त तुमचा…’ असे ध्येय ठेऊन सर्व महिलांसाठी हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाला ७५० हून अधिक महिला उपस्थित होत्या… नीरजा भानोत ची कहाणी बघताना कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनाच नीरजाच्या शौर्याचा अभिमान वाटला…